बैलगाडा छकडी संघटनेच्या अध्यक्षपदी विजय टाकवे यांची निवड

256 views

कार्याधक्षपदी सुरेश गायकवाड ; सचिव नवनाथ शेटे


Author : Admin
Publisher : Admin
Update : 2 months ago
Date : Tue Aug 13 2024

imageश्री. विजय टाकवे यांचा सन्मान करताना मान्यवर


मावळ :- मावळ-मुळशी-हवेली तालुका बैलगाडा छकडी संघटनेच्या अध्यक्षपदी करंजगावचे विजय शिवाजी टाकवे यांची बिनविरोध निवड झाली. बैलगाडा मालक संघटनेच्या बैठकीत ही बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच बैलगाडा छकडी संघटनेच्या कार्याधक्षपदी सुरेश गायकवाड व संदीप आंद्रे तर सचिवपदी नवनाथ शेटे, सह-सचिव रंगनाथ सावंत यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या कार्यकारणीमधे उपाधक्ष पदी देवराम गायकवाड,नवनाथ पडवळ,प्रविण घरदाळे व सनी हुलावळे तर खजिनदार स्वप्निल तरस व सचिन काजळे यांची सह-खजिनदार म्हणून नेमणूक करण्यात आली.संघटनेच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीला पारंपारिकता जपत डिजिटल संकल्पनेतून ग्लोबल रुप देण्याचा संकल्प संघटनेचा वतीने संकल्प करण्यात आला.