165 views
..
प्राईम रोझ इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात साजरा झाला
बेबडओहळ: दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी शिव मल्हार एज्युकेशन ट्रस्ट संचलित प्राईम रोझ इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात साजरा झाला. शाळेचे संस्थापक डॉ. सत्यवान बालवडकर सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका निकिता वधवा तसेच उपस्थित प्रमुख पाहुणे वानप्रस्थाश्रमच्या संचालिका उर्मिला भरत छाजेड यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन झाले.
त्यानंतर कार्यक्रमास सुरूवात झाली . उपस्थित मान्यवरांचे सत्कार झाले. या कार्यक्रमाचा विषय ‘One God Many Faces’ म्हणजे ‘एक परमात्मा पण त्याची असंख्य रूपे’ हा होता.वार्षिक स्नेहसंमेलन हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आणि कला गुणांचा कार्यक्रम आणि त्या गोष्टीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी आपला कलाविष्कार दाखवला . तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या उर्मिला छाजेड यांनी मार्गदर्शनपर वक्तव्य केले.कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी खूप उत्साहित होते. सर्व जाती धर्म वेगळे असले तरी विविधतेत एकता आहे. असा संदेश देण्याचा या कार्यक्रमा पाठीमागचा प्रमुख उद्देश होता. तसेच उपस्थित मान्यवर ,शाळेचे संस्थापक ,मुख्याध्यापिका यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला..अशा प्रकारे शाळेचे संस्थाप्रमुख, शाळेच्या मुख्याध्यापिका,उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, व पालकवर्ग,शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला.
..
....