27 views
..
मावळ :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डी येथील प्रा.रामकृष्ण मोरे
महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर मौजे दिवड, तालुका मावळ येथे, जनकल्याण रक्त पेढी पुणे व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सहकार्यातून दिवड येथे 110 मुलींचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.सोनवणे एच.बी. यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला डॉ. शिल्पागौरी गणपुले , डॉ. सुधीर बोराटे आणि डॉ.रामदास लाड हे उपस्थित होते. यावेळी मुलींना हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी डॉ. शिल्पा जाजु, डॉ. रेणु वटकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच अंगणवाडी येथे बोलक्या भिंतीचे चित्रीकरण करण्यात आले व पुस्तक पेटी, ग्रंथदान , खेळणी इ. साहित्याचे वाटप करण्यात आले. मौजे दिवड येथील प्राथमिक शाळेत देखील पुस्तकपेटी व खेळाचे साहित्य विद्यार्थ्यांना या प्रसंगी देण्यात आले. यानंतर येथील श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी व्यक्तिमत्त्व विकासावर व रोजगाराच्या संधी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संगीता रानडे (रोटरी क्लब ,चिंचवड पुणे ) यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना भाष्य केले कि, मुलींनी आकर्षणाला बळी न पडता वास्तविकतेचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे. आपल्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी सांगितले कि विद्यार्थिनींनी प्रामाणिकपणा, शिस्त, अणि वक्तशीरपणा याचे पालन केले पाहिजे. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हर्षा जोशी (अध्यक्ष रोटरी क्लब चिंचवड,पुणे) यांनी विद्यार्थ्यांंना येणार्या मानसिक अणि सामाजिक समस्यांविषयी मार्गदर्शन केले.
तसेच दुपारच्या सत्रात प्रा.रामकृष्ण मोरे कॉलेज मधील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. एम.एम. बागुल यांनी मराठी भाषेची अस्मिता व अभिजात मराठी भाषा यावर भाष्य केले.तसेच प्रा.डॉ.अमोल बीबे यांनी वृक्षारोपण करणे काळाची गरज असल्याचे मत मांडले. या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती एकता प्रतिष्ठानचे मा. बाळासाहेब घारे व रश्मी घारे गाव डोणे यांनी आर्थिक साक्षरता, बँकिंग मधील डिजिटल फसवणूक आदी विषयांवर आपले विचार मांडले. याप्रसंगी जिल्हा समन्वयक डॉ. सारिका मोहोळ राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.मधूकर राठोड, प्रा. डॉ.पुनम वाणी, प्रा. डॉ. वैभव साळवे तसेच समिती सदस्य प्रा. मधुजीत नायकवडी, प्रा.विक्रांत शेळके,प्रा. सरिता भंडारी, प्रा. गंगाधर किटाळे हे उपस्थित होते.
.....