मृदुंगमणी हभप कै. दत्तोबा महाराज शेटे यांच्या १७ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

317 views

..


Author : Admin
Publisher : Admin
Update : 3 months ago
Date : Wed Aug 21 2024

image...

वडगाव मावळ :- शेटेवाडी येथे मृदुंगमणी हभप कै. दत्तोबा महाराज शेटे यांच्या १७ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर, गुणीजणांचा सन्मान, कीर्तन, गायन आदी कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


भजनसम्राट हभप नंदकुमार महाराज शेटे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास माजी सभापती निवृत्ती शेटे, ज्ञानेश्र्वर दळवी, शांताराम कदम, देहू देवस्थानचे माजी अध्यक्ष नितीन महाराज मोरे, अभिमन्यू शिंदे, प्रदीप कदम, माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, राजू ढोरे, अमोल भेगडे, बाळकृष्ण वचकल, सुखदेव ठाकर, कमलेश राक्षे, दिलीप खेंगरे, मोहन घोलप, पांडुरंग मोडवे, नवनाथ मोढवे, कृष्णा भांगरे, विक्रम कलवडे नाथा घुले, वैभव पिंपळे संतोष पिंपळे आदी उपस्थित होते.


यावेळी झालेल्या रक्तदान शिबिरात २१ जणांनी रक्तदान केले तर ९७ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. पुण्यस्मरण दिनानिमित्त हभप जयश्री वचकल, हभप वाघुजी पाठारे यांना वारकरी भूषण तर मुख्याध्यापक राजू भेगडे व अजिनाथ ओगले यांना गुणवंत गुरुजन पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच उद्योजक बबनराव माने, पत्रकार गणेश विनोदे, सरपंच आशा कदम, वच्छला वाळंज या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला.


याप्रसंगी, हभप धनराज बाबा पाटील यांची कीर्तन सेवा झाली, तर प्रसिद्ध गायिका अश्विनी मिठे, सृष्ठी नेटके, गायत्री शेलार, आरती मिठे यांचा स्वरगंध गीत व अभंग गायनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे आयोजन नंदकुमार शेटे, मयुर शेटे, मनोज शेटे, यशवंत शेटे व शेटेवाडी ग्रामस्थांनी केले, रामदास शेटे यांनी प्रास्ताविक केले.