काँक्रीटीकरण व रुंदीकरणामुळे वडगावची बाजारपेठ झाली सुसज्ज !

1030 views

..


Author : Admin
Publisher : Admin
Update : 3 weeks ago
Date : Tue Oct 29 2024

image..


वडगाव मावळ. :-.वडगाव मावळ हे मावळ तालुक्याचे मुख्यालय आणि वडगावची बाजारपेठ ही संपूर्ण तालुक्याची बाजारपेठ, असं समीकरण असलेल्या वडगाव शहरामध्ये गेल्या काही वर्षात झपाट्याने नागरिकीकरण वाढत गेले आणि हीच बाजारपेठ कमी पडू लागली. आमदार सुनिल शेळके यांनी ही गरज लक्षात घेऊन वडगाव शहरातील मुख्य बाजारपेठेतील असलेला हा संपूर्ण रस्ताचे रुंदीकरण करून कॉंक्रिटीकरण केले आणि जुन्या काळापासून प्रसिद्ध असलेली वडगावची बाजारपेठ पुन्हा एकदा नावारूपाला आली.


वडगाव शहरातील प्रामुख्याने श्रीमंत महादजी शिंदे स्मारकापासून पूर्वेकडील वडगाव शहराच्या प्रवेशद्वारापर्यंत असणारा रस्ता म्हणजे वडगाव शहरातील मुख्य रस्ता आणि याच रस्त्यावर प्रामुख्याने मावळ पंचायत समिती कार्यालय ते छ.शिवाजी चौकापर्यंत असणारा वर्दळीचा भाग होय. याच भागामध्ये रस्त्याच्या दुतर्फा किराणा, कपडे, स्टेशनरी, भांडी, चप्पल, भाजी, फळे, सोने चांदी अशा विविध वस्तूंची विक्री करणारी दुकाने तसेच हॉटेल स्नॅक्स सेंटर अशी अनेक दालने आहेत.


त्यामुळे हा मुख्य रस्ता म्हणजे वडगाव शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.जुन्या काळातही हीच संपूर्ण तालुक्याची मुख्य बाजारपेठ होती. परंतु अलीकडच्या काळात वडगाव शहराची झपाट्याने नागरिकीकरण झाले आणि या मुख्य रस्त्यावर नागरिकांची वर्दळ, वाहनांची वाहतूक दिवसेंदिवस वाढत गेली, त्यामुळे हा मुख्य रस्ता कमी पडू लागला होता.


त्यात याच रस्त्यालगत असलेल्या वडगाव न्यायालयाचे विस्तारीकरण होऊन या ठिकाणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू झाले याशिवाय पूर्वीपासून सुरू असलेले तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम, तलाठी कार्यालय, दुय्यम निबंधक, सहाय्यक निबंधक, पोलीस स्टेशन अशी विविध शासकीय कार्यालये वडगाव शहरात सुरू आहेत.परिणामी मुख्य रस्त्याने वर्दळ दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे.


त्यामुळे वडगाव शहराचा सर्वांगीण विकास होत असताना खऱ्या अर्थाने मुख्य रस्ता वाढवणे व पक्का होणे ही काळाची नव्हे तर आजचीच गरज आहे,हे लक्षात घेऊन आमदार सुनील शेळके यांनी या मुख्य रस्त्यासाठी सुमारे ७.५ कोटी रुपये निधी मंजूर केला व प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. बघता बघता पूर्वेकडील प्रवेशद्वारापासून मावळ पंचायत समिती कार्यालयापर्यंत संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले असून मावळ पंचायत समिती पासून पश्चिमेकडील प्रवेशद्वारापर्यंत पुढील काम ही लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठीही सुमारे २.५ कोटी रुपये निधी मंजूर आहे, एकंदर वडगाव शहराच्या मुख्य रस्त्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी तब्बल १० कोटी रुपये निधी उपलब्ध केला आहे.


रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना केवळ तेवढ्यावरच न थांबता आमदार सुनील शेळके यांनी हा रस्ता जास्तीत जास्त रुंद झाला पाहिजे यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले, त्यामुळे मुख्य बाजारपेठ असलेला हा रस्ता भविष्याच्या दृष्टीने अतिशय प्रशस्त असा झाला असून या कामामुळे वडगावच्या बाजारपेठेचे महत्त्वच वाढले आहे. याशिवाय रस्ता प्रशस्त झाल्यामुळे सातत्याने होणारी वाहतूक कोंडीही कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळाला आहे.