239 views
मावळ :- स्थानिक भूमिपुत्रा कामावर ठेवताना कायमस्वरूपी म्हणून कामाला घेतले असल्याचे सांगून त्यांना अचानकच काही कारण नसताना कामावरून काढून टाकण्यात आले या कंपनीच्या म्यॅनेजमेंट कडून कामगारांचा पीएफ आणि काम केलेले पगार देण्यात नकार देण्यात आल्याचे कामगार सांगत आहेत. या संदर्भात कामगारांनी आमदार सुनिल शेळके यांना निवेदन देऊन सदर कंपनी विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर प्रोटेक्टेच आयटीएमएस या कंपनीला कॅमेरे बसवण्याचे टेंडर मिळाले होते. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कॅमेरे बसवून. त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचे काम हे कायमस्वरूपी असल्याचे सांगत हे काम करण्यासाठी कंपनीने येथील स्थानिक युवकांना कामावर घेतले होते.. मागील सुमारे ७ ते ८ महिन्यांपासून द्रुतगती मार्गावर धोकादायकपणे कोणतीही सेफ्टी नसताना, जीव धोक्यात टाकून या कामगारांकडून काम करून घेण्यात आले, व आता द्रुतगती मार्गावरील कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण होताच स्थानिक युवकांना कंपनीने कोणतीही माहिती न देता अचानक कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
तसेच कामगारांना अचानक कामावरून कमी करताना त्यांना त्यांच्या हक्काचा पगार व पीएफ देण्यास देखील कंपनी कडून टाळाटाळ केली जात आहे.
या संदर्भात म्हणून मावळ तालुका कामगार सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उपाध्यक्ष चिन्मय कुटे ह्यांनी या बाबत आमदार सुनिल शेळके तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली असून. स्थानिक भूमीपुत्रांना नौकरी वरून काढले किंवा त्यांना त्रास देण्यात आला तर कंपनी च्या विरोदात आमरण उपोषण करण्यात येईल असा ईशारा चिन्मय कुटे यांनी कंपनी प्रशासनास दिला आहे.