एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय येथे “अमृतपान-आईचे दूध अमृत समान”या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

56 views

..


Author : Admin
Publisher : Admin
Update : 1 month ago
Date : Sat Aug 03 2024

image..


तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथील माईर एमआयटी पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय, तळेगाव दाभाडे येथे *“स्तनपान सप्ताह”* उत्साहात साजरा करण्यात आला . जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त, एमआयएमईआर मेडिकल महाविद्यालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी स्तनपान या विषयावर *'अमृतपान' या कार्यशाळेचे* आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मावळ विभागातील २५० हून अधिक आरोग्यसेवा व्यावसायिक उपस्थित होते, ज्यात डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, उपसेविका, आशा सेविका यांचा समावेश होता. संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ.सुचित्रा नागरे व डॉ विरेंद्र घैसास यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले.


कार्यशाळेचा उद्देश स्तनपानाच्या पद्धतींचा प्रचार व समर्थन करणे तसेच स्तनपानाशी संबंधित गैरसमज दूर करणे हा होता . गेले चार वर्षे संस्था हा उपक्रम राबवत आहे .कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे प्रसूती व स्त्रीरोग संस्थेच्या अध्यक्षा डॉ.आरती निमकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शेरॉन सोनवणे होत्या. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. संध्या कुलकर्णी आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी यांचीही उपस्थिती होती.


ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंगला वाणी, डॉ. शशिकांत पवार, डॉ. शैलजा माने, डॉ. शिल्पा क्षीरसागर, आणि डॉ. चारुलता बापये यांच्यासह, स्तनपान सल्लागार श्रीमती अमृता देसाई आणि रश्मी पोडुवाल यांच्यासह मान्यवर प्राध्यापकांनी मौल्यवान मार्गदर्शन केले. पूर्ण ८ दिवस नागरिकांच्या माहितीसाठी विविध कार्यक्रम करून स्तनपानसप्ताह साजरा होणार आहे. 


प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली कोरडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ सुषमा शर्मा ,डॉ. दत्तात्रय गोपाळघरे, डॉ जितेंद्र माने यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ मीनाक्षी सुर्वे यांनी इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने सचिव म्हणून काम केले.  


सदर कार्यशाळा उत्तमरित्या आयोजित केली याबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, समन्वयक डॉ. तुषार खाचणे, प्राचार्या डॉ. संध्या कुलकर्णी, कार्यकारी संचालक डॉ. वीरेंद्र घैसास, कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांनी नियोजकांचे अभिनंदन केले.