पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांसाठी व त्यांच्या मुलांसाठी कल्याणकारी योजना राबवणार - उद्योजक विलास काळोखे

224 views

नारायणराव काळोखे नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना १० % लाभांश जाहीर


Author : Admin
Publisher : Admin
Update : 4 months ago
Date : Wed Sep 18 2024

image

मावळ : तळेगाव दाभाडे येथील नारायणराव काळोखे नागरी सहकारी पतसंस्थेची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ संचलित नाना नानी पार्क येथे नुकतीच पार पडली. या सभेत पतसंस्थेच्या सभासदांना १०% लाभांश जाहीर करण्यात आला.पतसंस्थेचा कर्जदार वर्ग हा समाजातील सर्वसामान्य घटक असून सभासदांच्या मुलांसाठी व सभासदांसाठी आपण कल्याणकारी योजना राबवणार असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक विलास बबनराव काळोखे यांनी सांगितले.


यावेळी श्रीकांत वायकर, ॲड कुणाल काळोखे, चैतन्य कोरडे, जयश्रीताई काळोखे, सुलोचना पडवळ, ईशांत काळोखे, अमित काळोखे, गिरीश चौरे, बाजीराव काळोखे, ॲड.शरद कदम इत्यादी संचालक उपस्थित होते.


नारायणराव काळोखे पतसंस्था ही गेली ३१ वर्ष तळेगाव शहरातील छोटे व्यावसायिक,पथारीवाले,लघु उद्योजक, हातगाडी वाले, भाजी विक्रेते इत्यादींना अल्प मध्यम व दीर्घ मदतीचा कर्जपुरवठा सातत्याने करत आहे. पतसंस्थेचा कर्जदार वर्ग हा समाजातील सर्वसामान्य घटक असून सभासदांच्या मुलांसाठी व सभासदांसाठी आपण कल्याणकारी योजना राबवणार असून यावर्षी सभासदांना १० % लाभांश देणार असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक विलास बबनराव काळोखे यांनी केले असून सभासदांच्या विशेष गुणवत्ता प्राप्त पाल्यांना सन्मानचिन्ह देऊन सदर प्रसंगी सन्मानित करण्यात आले तर नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या व उत्तम कामगिरी करणाऱ्या दैनंदिन प्रतिनिधींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


सभासदांना भविष्यात जास्तीत जास्त सुविधा देण्याचा मानस विलास काळोखे यांनी व्यक्त केला संस्थेला ३१ वर्ष पूर्ण झाले असून १८६९ सभासद आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत काळोखे यांनी केले, सेक्रेटरी विश्वनाथ काळोखे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तज्ञ संचालक संजय संदानशिव यांनी अहवाल वाचन करून सभासदांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

सुरेश शेंडे, भगवान शिंदे, संजय मेहता, दिलीप पारेख इत्यादी सभासदांनी संस्थेच्या हिताच्या सूचना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापिका रोहिणी नाटक, संध्या मांदळे, चंद्रकांत चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. स्नेहभोजनाने सभेची सांगता झाली.