एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयातील "श्री विश्वनाथ महाकालेश्वर" मंदिरामध्ये "महाशिवरात्री" उत्साहात साजरी

105 views

..


Author : Admin
Publisher : Admin
Update : 7 months ago
Date : Fri Mar 08 2024

image..


तळेगाव दाभाडे :शुक्रवार दिनांक ०८ मार्च २०२४ रोजी माईर एमआयटी पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयातील "श्री विश्वनाथ महाकालेश्वर" मंदिरामध्ये "महाशिवरात्री" निमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ विश्वनाथ दा कराड व सौ उषा वि कराड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रुद्राभिषेक पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिराची विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच गुरुवारी भागवत कृष्ण एकादशी निमित्त संध्याकाळी हरिपाठ व ह.भ.प. श्री शालिकराम खंदारे महाराज व विश्वशांती भजनी मंडळ यांचे सुश्रव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी संस्थेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दर्पण महेशगौरी, समन्वयक डॉ तुषार खाचणे, प्राध्यापक डॉ राजेंद्र प्रसाद गुप्ता, प्राचार्या डॉ संध्या कुलकर्णी, डॉ. उमेश नागरे, कार्यकारी संचालिका डॉ सुचित्रा नागरे व कार्यकारी संचालिका प्रा.सौ स्वाती चाटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


तसेच संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व तळेगाव परिसरातील नागरिक या सोहळ्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित होते.