2353 views
..
तळेगाव दाभाडे : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्या नंतर निवडणुक विभागाकडून करण्यात येणाऱ्या अर्ज छाननी प्रक्रियेत सदर उमेदवाराने भरलेला अर्ज वैध ठरणे अतिशय महत्वाचे असते आणि उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत अर्ज बाद झाल्यास निवडणुक लढविता येत नाही यामुळे विरोधकांकडून आमदार शेळके यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी प्रयत्न झाले मात्र तरी देखील आमदार शेळके यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने विरोधकांची चिंता वाढली आहे..
आमदार सुनील शेळके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने नागरिक वडगाव येथे उपस्थित झाले होते. अर्ज भरून झाल्यानंतर सुनील शेळके काय बोलणार याची आतुरता या नागरिकांना होती. शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी आलेला प्रत्येक नागरिक हा सुनील शेळके यांचे विचार ऐकण्यासाठी थांबून राहिला होता. त्या ठिकाणी आलेल्या महिला, तरुणी, युवक युवती या सर्वांनी अक्षरशः आमदार सुनील शेळके यांच्या उमेदवारी अर्जाचा जल्लोष व आनंद उत्सव साजरा केला.
आमदार सुनील शेळके यांनी केलेले शक्ती प्रदर्शन याला मात करण्यासाठी विरोधकांनी देखील तालुक्यातून व तालुक्याच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात लोकांना आणण्याचा प्रयत्न केला. मात्र रॅली पुरते आलेले हे नागरिक उमेदवार व त्यांच्या समर्थकांचे भाषण ऐकण्यासाठी देखील थांबले नाहीत. यामुळे हतबल झालेल्या विरोधकांनी सुनील शेळके यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी असल्याची बोम उटवत त्यावर हरकत नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणूक आयोगाने त्याला देखील चपराक देत आमदार सुनील शेळके यांचा उमेदवारी अर्ज वैद्य ठरवला आहे. त्यांना ईव्हीएम मशीन वर क्रमांक एकचे चिन्ह देण्यात आले आहे.
विरोधकांच्या सगळ्या खेळी अपयशी ठरवू लागल्याने व आमदार सुनील शेळके हेच प्रत्येक ठिकाणी वरचढ होत असल्याचे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. निवडणुकीला अजून वीस दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. प्रचारासाठी 18 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे मात्र या ना त्या कारणाने आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात कुरघोडी करायची, त्यांना बदनाम करायचे षडयंत्र हे विरोधकांकडून जाणीवपूर्वक सुरू आहे. असे असले तरी मतदार राजा सुज्ञ आहे. आमदार सुनील शेळके यांनी पाच वर्षात या मावळ तालुक्यातील जनतेसाठी काय विकास कामे केली आहेत, पुढील पाच वर्षे त्यांचे काय व्हिजन आहे या सर्व गोष्टी मतदार राजाला माहित असल्यामुळे मावळ तालुक्यातील प्रत्येक मतदार हा आमदार सुनील शेळके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आमदार सुनील शेळके यांच्या संवाद मेळाव्याला होत असलेली गर्दी हेच दाखवून देत आहे. म्हणून या मतदाराला धाक दडपशाही दाखवत दाबण्याचा प्रयत्न होत आहे. हा मतदार उद्याच्या काळामध्ये आपल्या मतदान रुपी अधिकाराचा वापर करत विरोधकांना त्यांची जागा दाखवून देईल यात कोणतेही शंका नाही.