131 views
..
मावळ : मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचारदौऱ्याची सुरुवात सोमाटणे गावाचे ग्रामदैवत चौराईदेवीचे दर्शन घेऊन सुरू झाला. गुलाबाच्या फुलांच्या पायघड्या घालून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ग्रामदैवत चौराई देवीचे दर्शन घेत भेगडे आशीर्वाद घेतले. दरम्यान, ग्रामस्थांनी एकमताने अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला.
यावेळी झालेल्या ग्रामस्थांच्या सभेला सरपंच स्वातीताई कांबळे, माजी सरपंच नवनाथ मुऱ्हे, मच्छिन्द्र मुऱ्हे, माजी उपसरपंच मंगल मुऱ्हे,उपसरपंच अश्विनी मुऱ्हे, मंगल मुऱ्हे, माजी उपसरपंच नंदू मुऱ्हे, अनंता आंद्रे, रामभाऊ मुऱ्हे, बाजीराव मुऱ्हे, प्रकाश मुऱ्हे, नरेश मुऱ्हे, रामभाऊ मुऱ्हे, अक्षय मुऱ्हे, प्रवीण मुऱ्हे राहुल मुऱ्हे, अमित मुऱ्हे, राजू धारोडकर, अविनाश मुऱ्हे, हसन शेख, प्रशांत मुऱ्हे, बापू मुऱ्हे, प्रवीण मुऱ्हे, नंदकुमार मुऱ्हे, प्रीतम मुऱ्हे, पपीलाल जगदाळे, विपुल मुऱ्हे, महिंद्र मुऱ्हे, निलेश मुऱ्हे, चंद्रकांत मिसाळ यांच्यासह ग्रामस्थ, विविध कार्यकारी सोसायटीचे आजी - माजी सदस्य, माजी सरपंच, माजी उपसरपंच, ज्येष्ठ नागरिक, महिला आदी उपस्थित होते.
शिरगाव येथे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच पल्लवी गोपाळे, उपसरपंच अक्षय गोपाळे, रवी गोपाळे, तानाजी गोपाळे, गोविंद गोपाळे, सोमनाथ गोपाळे, विजय गोपाळे, पहिले सरपंच राजाराम गोपाळे, जगन्नाथ गोपाळे, गुलाबराव गोपाळे, अनिल दुर्गे, रंगनाथ गोपाळे, विजय गोपाळे, धनाजी अरगडे, रमेश गोपाळे, मोहन अरगडे, समीर अरगडे, अभय गोपाळे यांच्यासह ग्रामस्थ, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
गहुंजे येथे ग्रामदैवत चौँडाई माता मंदिरात दर्शन घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. फुलांचा वर्षाव करीत स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच कुलदीप बोडके, उपसरपंच नितीन बोडके, उपसरपंच निलेश बोडके, किरण बोडके, सागर बोडके, सोमनाथ बोडके, गोविंद बोडके, भीमाशंकर बोडके, संदीप बोडके, माजी सरपंच वनिता आगळे, शारदा बोडके, शीतल बोडके, वर्षाराणी बोडके, वंदना तरस, पोलीस पाटील सारिका आगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साळूंब्रे येथे बापूसाहेब भेगडे यांचे फुलांचा वर्षाव करीत स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच विशाल राक्षे,, उपसरपंच सुभाष राक्षे, रवींद्र विधाटे, सतीश राक्षे, कल्याणी राक्षे, अंजना टिळेकर आदी उपस्थित होते.
भेगडे यांचे गोडुंब्रे येथे फटाक्यांची आतिषबाजी करती व बापूसाहेब भेगडे आगे बढो' या घोषणा देण्यात आल्या. यावेळी सरपंच सागर सावंत, शरद सावंत, अनिकेत चोरगे, नितीन सावंत, समीर सावंत, शिवाजी येवले, धनंजय चोरगे, रोहिणी सावंत, वंदना चोरगे आदी उपस्थित होते.
दारुंब्रे येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आले. माजी सरपंच श्रीधर वाघोले, ईश्वर वाघोले, शरद वाल्हेकर, संदीप सोरटे, गुलाबराव वाघोले, काळुराम वाघोले, लक्ष्मण शितोळे, गुरूदास शितोळे, बाळकृष्ण शितोळे, अनिकेत शितोळे, राजेश वाघोले, संदीप लोहर आदी उपस्थित होते.
सांगवडे येथे फटाक्यांची आतिषबाजी करीत व फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सरपंच रोहन जगताप, सुरेश राक्षे, किरण राक्षे, सुभाष राक्षे, अनिल राक्षे, हनुमंत लिम्हण, ज्ञानेश्वर राक्षे, योगेश राक्षे, खंडूअप्पा राक्षे, गोपाळ आमले, शिवाजी राक्षे, लक्ष्मण चव्हाण, अरुणा राक्षे, नंदा राक्षे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी विविध समस्यांचा पाडाच वाचला. पाणी समस्या, रस्ते खोदून ठेवलेत, सोसायट्यांना ड्रेनेज लाईनची व्यवस्था अशी कामे करणे नितांत गरजेचे आहे.
गणेश भेगडे म्हणाले, की बापूसाहेब भेगडे यांनी कारखान्याच्या माध्यमातून मोठी विकासकामे केली आहेत. तालुक्यात वेगळी संस्कृती तयार करू पाहत आहेत. भ्रष्टाचार, दहशतमय वातावरण, पैसा फेक संस्कृती नष्ट करायची आहे.
रवींद्र भेगडे म्हणाले, की गेल्या पाच वर्षात दादागिरी, दडपशाही, लाचारी कमी करायची आहे. आपण खंबीरपणे पाठीशी उभे आहात, हे आपल्या उत्स्फूर्त उपस्थितीने दिसतेच आहे.
-----------------------------------------
ग्रामस्थांचा बापूसाहेब भेगडे यांना विजयी करण्याचा निर्धार :
सोमाटणे, शिरगांव, गहुंजे, साळूंब्रे, गोडुंब्रे, दारुंब्रे, सांगवडे या गावांना भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. या सर्व गावामध्ये भेगडे यांचे फटाक्यांची आतिषबाजी, फुलांच्या पायघड्या, फुलांचा वर्षाव करीत स्वागत करण्यात आले. संपूर्ण गाव स्वागतासाठी लोटल्याचे चित्र होते. प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आश्वासन दिले.
निवडून आल्यानंतर सर्व समस्याचे निराकरण करण्यास आपण बांधील असू. काही मंडळी खोटंही रेटून बोलतात. पण सत्य लपत नाही. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात ट्रेनिंग सेंटर उभारणार आहे. नदीसुधार प्रकल्प, पाणीप्रश्न, रोजगारनिर्मिती, शिक्षण, नोकरी या महत्त्वच्या सर्व प्रश्नांमध्ये लक्ष घालून मावळ तालुका क्रमांक एकवर आणणार आहे.
-बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार, मावळ विधानसभा