कोरोना काळात आमदार शेळके यांनी घालून दिला 'मावळ पॅटर्न'चा आदर्श

1254 views

कोरोना संकटात मावळचे रक्षण करणारा 'कोरोना योद्धा'


Author : Admin
Publisher : Admin
Update : 5 months ago
Date : Sat Oct 26 2024

image..

मावळ - संकटे तुमच्यातील जिद्द आणि शक्तीची परीक्षा पाहण्यासाठीच येत असतात. कोरोनाचे संकट देखील असेच होते. या संकटात लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर जनतेच्या घरातील सदस्य म्हणून आमदार सुनील शेळके यांनी जिद्दीने काम केले.


माणसाच्या माणुसकीची परीक्षा बघणाऱ्या या काळात आमदार शेळके यांनी संपूर्ण मावळ तालुक्यात रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत केली, धीर दिला.


आमदार म्हणून काम स्वीकारल्यानंतर लगेचच कोरोनाचा विळखा पडला. आमदार शेळके यांनी कोरोना काळात रुग्णांना खंबीर साथ दिली. 'मदत नव्हे तर कर्तव्य' या जाणिवेतून कोरोना काळात सुनील शेळके कार्यरत राहिले.


मावळातील ग्रामीण आणि आदिवासी भागात घरपोच धान्य पुरवठा केला. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी कोविड काळात कॉल सेंटर आणि मदत कक्षाची स्थापना केली. रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करून दिली. तालुक्यात पहिल्यांदाच ऑक्सिजन प्लांट उभारला.


देहूरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि काले कॉलनी ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट याच काळात केला. मावळ तालुक्यात विविध ठिकाणी अन्नछत्र उभारले,तसेच पाच लाखांहून अधिक फेस मास्कचे वाटप देखील केले.

.....


कोविडच्या महामारीमुळे निर्माण झालेली भयावह परिस्थिती सगळ्यांनीच अनुभवली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे, पिंपरी - चिंचवड आणि मुंबई शहराच्या जवळ असलेल्या मावळात या विषाणूचा संसर्ग रोखण्यात बहुतांशी यश मिळाले. या काळात स्वतःच्या जीवाची परवा न करता मावळ तालुक्याच्या जनतेचे संरक्षण करण्यासाठी सुनील आण्णा अहोरात्र झटले. वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, आरोग्य सेवक, आशा सेविका, पोलीस बांधव आणि सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी यावेळी मोलाची साथ दिली.


जनसेवा हाच ध्यास बाळगून अनेक वर्षांपासून लोकप्रिय आमदार सुनील शेळके मावळच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. पाच वर्षांपूर्वी मावळच्या जनतेने सुनील अण्णांवर या तालुक्याची जबाबदारी सोपवली. या काळात ‘मावळच्या जनतेचा मावळा’ या भूमिकेतूनच आमदार सुनील शेळके लोकसेवेकरता कटिबद्ध राहिले. मावळच्या जनतेने मोठ्या विश्वासाने टाकलेली ही जबाबदारी आमदार सुनील शेळके यांनी समर्थपणे सांभाळली. “पॅटर्न मावळचा, परिपूर्ण विकासाचा” असे नुसते न म्हणता सुनिल शेळके यांनी आपल्या कामातून जनतेचे प्रेम देखील मिळवले.