जन सन्मान यात्रेला मावळात 'रेकॉर्ड ब्रेक' गर्दी!

1900 views

तळेगावच्या रस्त्यांवर मावळातील भगिनींच्या 'रेकॉर्ड ब्रेक' गर्दीचा महापूर*


Author : Admin
Publisher : Admin
Update : 4 months ago
Date : Fri Aug 16 2024

imageतळेगाव दाभाडे येथील कार्यक्रमांत महिलांशी संवाद साधताना मा.श्री अजित पवार..


*राखी पौर्णिमेपूर्वीच तळेगावात साजरे झाले धुमधडाक्यात रक्षाबंधन!*


तळेगाव दाभाडे, 16 ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रेला मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे येथे 'रेकॉर्ड ब्रेक' गर्दी पहायला मिळाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राखी पौर्णिमेपूर्वीच मोठ्या धुमधडाक्यात तळेगावमध्ये महिलांनी रक्षाबंधन साजरे केले. महिलांच्या विक्रमी गर्दीमुळे सभा मंडप तर 'ओव्हर फ्लो' झालाच शिवाय तळेगावातील रस्त्यांवरही गर्दीचा महापूर अनुभवायला मिळाला.


मावळचे आमदार सुनिल शेळके यांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी झाल्यामुळे सभा मंडपात अनेकांना प्रवेश देखील मिळू शकला नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ संयोजकांवर आली. थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे शाळेचे मैदानात सुमारे 20 हजार महिलांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्यक्षात 70 हजारांहून अधिक महिला या कार्यक्रमासाठी आल्यामुळे कार्यक्रम सुरू असताना मारुती मंदिर ते लिंब फाटा हा पूर्ण रस्ता भगिनींच्या गर्दीने ओसंडून वाहत होता.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमदार शेळके यांच्या समर्थकांनी पूर्ण ताकद लावल्याचे पाहायला मिळत होते. तालुक्याच्या ग्रामीण भागातून महिला आल्याचे पहायला मिळाले.जन सन्मान यात्रेला रक्षाबंधनाची जोड दिल्यामुळे सर्व भगिनी नव्या साड्या परिधान करून दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण तळेगाव शहराला उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले होते.

...


अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करूनही अपेक्षेपेक्षा कित्येक पटीने जास्त प्रतिसाद मिळाल्यामुळे संयोजकांची थोडीशी तारांबळ उडाल्याचे पहायला मिळत होते. सभास्थानी प्रवेश मिळाला नाही तरी कोणतीही तक्रार न करता सर्व भगिनी एका वेगळ्या अनुभवाचा आनंद घेताना दिसत होत्या.


या अभूतपूर्व गर्दीमुळे भगिनींची गैरसोय झाल्याबद्दल आमदार सुनिल शेळके एवढेच नव्हे तर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सर्व भगिनींची दिलगिरी व्यक्त केली. आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात महिलांचा एवढा प्रतिसाद प्रथमच मिळाल्याचा उल्लेख अजितदादा यांनी त्यांच्या भाषणात आवर्जून केला.


कार्यक्रम संपल्यानंतरही तळेगावच्या रस्त्यांवरील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी तब्बल दोन ते अडीच तासांचा कालावधी लागला. तळेगावातील रेकॉर्ड ब्रेक गर्दीचे रक्षाबंधन हा संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.


..