महायुतीचे उमेदवार आमदार शेळके उद्या फोडणार प्रचाराचा नारळ

246 views

महायुतीच्या प्रचारास रविवारी वडगावमध्ये होणार प्रारंभ


Author : Admin
Publisher : Admin
Update : 4 months ago
Date : Sat Nov 02 2024

image..


वडगाव मावळ, : - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना आरपीआय स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ रविवारी (३ नोव्हेंबर) सकाळी दहा वाजता वडगाव मावळ येथे होणार आहे.


वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचे आशीर्वाद घेऊन आमदार शेळके प्रचाराचा नारळ फोडतील. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन आठवले गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तसेच महायुतीत सहभागी असलेल्या सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 


प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आमदार शेळके यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम मावळवासीयांनी उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले आहे.


....