246 views
..
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथील माईर एमआयटी पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या जनरल सर्जरी विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक डॉ सचिन नाईक यांची नाशिक येथे आयोजित ४६ व्या MASICON मध्ये असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया (ASI) - महाराष्ट्र चॅप्टरचे ^सचिव* म्हणून निवड करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षकाची राज्याच्या उच्चभ्रू शल्यचिकित्सकांच्या संघटनेच्या पदावर निवड होणे, हा केवळ एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय साठीच नाही तर संपूर्ण वैद्यकीय शिक्षक बांधवांसाठी अभिमानास्पद आणि विशेष क्षण आहे. ही नेमणूक तीन वर्षाकरिता करण्यात आली आहे.
असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाची स्थापना ही भारतीय शल्यचिकित्सकांमध्ये एकमेकांच्या अनुभवांची देवाण घेवाण करण्याच्या आणि त्यांचे शस्त्रक्रिया कौशल्य वाढवण्याच्या उद्देशाने करण्यासाठी १९३८ मध्ये करण्यात आली.
डॉ सचिन नाईक हे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेत जनरल सर्जरी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा २४ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांनी एमबीबीएस (१९९२) आणि एमएस सर्जरी (१९९८) मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी (AIG), हैदराबाद येथे एंडोस्कोपीचे प्रशिक्षण तसेच जीईएम (GEM) हॉस्पिटल, कोईम्बतूर येथे लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियाचे शिक्षण पूर्ण केले.
डॉ सचिन नाईक हे असोसिएशन ऑफ मिनिमल ऍक्सेस सर्जन्स ऑफ इंडिया (AMASI), इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA–पुणे), पूना सर्जिकल सोसायटी (PSS), सोसायटी ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपी ऑफ इंडिया (SGEI) व इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी (ISG) यांचे प्रमुख सदस्य आहेत.
डॉ सचिन नाईक यांची महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ दर्पण महेशगौरी, समन्वयक डॉ तुषार खाचणे, प्राचार्या डॉ संध्या कुलकर्णी, कार्यकारी संचालक डॉ विरेंद्र घैसास व कार्यकारी संचालिका डॉ सुचित्रा नागरे यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्याकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या.