undefinedखर्चाने दुरूस्ती

249 views

एमआयडीसी प्रशासन व स्थानिक ग्रामस्थ यांच्या वादामुळे रखडला रस्ता.


Author : Admin
Publisher : Admin
Update : 1 month ago
Date : Mon Aug 05 2024

image...

मावळ :- आंबी- मंगरुळ- आंबळे- निगडे रस्ता निर्मितीसाठी एमआयडीसी मार्फत ४६ कोटी निधी मंजुर झाले असुन कार्यारंभ आदेश देऊन ठेकेदार नेमणूक देखिल झालेली आहे. परंतू सदर रस्ता केवळ स्थानिक शेतकरी यांना एमआयडीसी कडुन भुसंपादन मोबदला न मिळाल्यामुळे रखडला आहे. ज्या स्थानिक जमिन मालक यांच्या भुसंपादन विषयक मागण्या आहेत त्यांच्याशी चर्चा करून एम आय डी सी प्रशासनाने त्याच्या मागण्या पुर्ण करणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या जाणीवपुर्वक दुर्लक्षितपणा मुळे सदर आंबी ते निगडे रस्ता दुरूस्ती होत नाही.


सदर रस्ता दुरुस्ती साठी क्रशर व खाण उद्योजक यांनी मागील १७ ते १८ वर्षात करोडो रुपयांच्या स्वः निधीतून खर्च केलेला आहे. वास्तविक शासनाला करोडो रूपये महसुल व कर मिळवुन देणाऱ्या ह्या व्यवसायावर अवलंबून बरेच स्थानिक भूमिपुत्र डंपर, पोकलेन, खाण, क्रशर मालक देखिल आहेत.


या वर्षी सरासरी पेक्षा अधिकचा पाऊस पडल्यामुळे सदर रस्ता सतत नादुरुस्त होत आहे तरीही क्रशर उद्योजक वारंवार भर पावसात सदर रस्त्याची दुरूस्ती व डागडुजी स्वखर्चाने करत आहेत आणी ते करून ही स्थानिक ग्रामस्थ यांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे,* स्थानिक ग्रामस्थ क्रशर उद्योजक यांच्या गाड्या अडवून ठेवणे, ड्रायव्हर व कामगार यांना शिवीगाळ करणे अशा बाबींमुळे खाणकामगार यांच्या मध्ये भीतीचे वातावरण आहेत. मंगरूळ व आंबळे येथिल क्रशर व्यवसायावर स्थानिक युवक, ग्रामस्थ व मावळातील बरेच उद्योग व्यवसाय अवलंबुन आहेत, त्यामुळेच असे चुकीचे प्रकार रोखणे व कामगारांना सुरक्षा देणे पोलिस प्रशासनाची जबाबदारी आहे.


सदर आंबी -मंगरूळ -आंबळे रस्ता लगत अरसेनाल स्टील, सिंटरकाॅम, अनेक डांबर प्लॅन्ट व स्थानिक यांचे वाळु बनविणारे प्लॅन्ट देखिल आहेत सदर रस्ताने त्यांची देखिल अवजड वाहतुक मोठया प्रमाणावर चालु असते परंतु त्यांच्या कडुन क्रशर उद्योजक यांना कसल्याही प्रकारचे रस्ता दुरूस्तीसाठी सहकार्य कधीही केले जात नाही, त्यांनी ही रस्ते दुरूस्ती साठी मदत केली तर आजुन ही चांगल्या रितीने रस्ते ठेवता येतील.*