406 views
१ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
अवैद्यरित्या गावठी मद्याची विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
सुमारे १ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
वडगाव मावळ :- लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचासंहितेच्या अनुशंगाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नियमबाह्य दारू विक्री तसेच अवैधरीत्या मद्य विक्री करणाऱ्यांवर करडी नजर असून रविवारी (दि.१२)
राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे यांनी अवैद्यरीत्या गावठी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत एकूण १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्दमाल जप्त केला तसेच खेड तालुक्यातील वसुली येथील अवैद्यरित्या मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल राजदरबार वर कारवाई करून ४ हजार ८५५ रुपयांचे मद्य जप्त केले आहे. तर खेड तालुक्यातील वासुली येथील हॉटेल सानिका (एफएल ३) याने दारू विक्री बंद असताना देखील नियमाचे उलंघन केल्या प्रकरणी हॉटेल सनिका यावर कारवाई केली आहे
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक संजय सराफ यांना मावळ तालुक्यातील शिरगाव गावच्या हद्दीतील शिरगाव - गहुंजे रोडवरून अवैध गावठी दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसर सदर ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचला असता त्यांना एक मारुती सुझुकी कंपनीचे झेन या मॉडेलचे चारचाकी वाहन (क्रमांक एम.एच.१४ ए.ई ३०६५) हे वाहन अवैध गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करताना मिळून आले. या वाहनात गावठी मद्याची पूर्ण भरलेली ३५ लिटर क्षमतेची ८ प्लास्टिक कॅन अशी एकूण २८० लिटर गावठी मद्य जप्त करण्यात आले. तसेच वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण १ लाख ४८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन चालक निलेश ज्ञानेश्वर पवार, (वय-३५ वर्ष, रा-गोडूंब्रे, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड तालुक्यातील वासुली गावच्या हद्दीतील हॉटेल राजदरबार मध्ये अवैधरित्या देशी-विदेशी मद्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली असता त्या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी अवैधरित्या विक्रीसाठी आणलेले ४ हजार ८५५ रुपयांचे अवैध देशी-विदेशी मद्य मिळून आले. यामध्ये आरोपीनामे राजेश दगडोबा घोनशेठवाड, (वय-४२, रा-हॉटेल राजदरबार, वासुली, ता. खेड) अटक करण्यात आली. वरील दोन्ही गुन्ह्यात मिळून एकूण १, लाख ५३ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय आयुक्त सागर धोमकर , अधीक्षक चरणसिंग राजपूत, उपअधीक्षक सुजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाचे निरिक्षक संजय सराफ, पुणे. श्री. प्रवीण गाडगे, श्री. प्रशांत रुईकर, दुय्यम निरीक्षक, श्री. रवि लोखंडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक व जवान सर्वश्री शिवाजी गळवे, रसूल काद्री, अविनाश दिघे, प्रदीप गवळी, अमोल अन्नदाते या पथकाकडून कारवाई करण्यात आली. सदरच्या गुन्ह्यांचा पुढील तपास श्री. श्री. प्रशांत रुईकर सो व श्री. प्रवीण गाडगे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभाग, पुणे. हे करीत आहेत.