370 views
..
मावळ : दि.१८
मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने कुरवंडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोलर माध्य.विद्यालयामधील 42 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. शाळेत दूरवरुन येणाऱ्या मुलांची निवड प्राधान्याने करण्यात आल्याने नवीन सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थी भारावून गेले.
'शिक्षणासाठी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना दुर अंतरावर पायपीट करून यावे लागते. या प्रवासाचा परिणाम प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर दिसून येतो. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबु नये व त्यांचा वेळ वाचावा यासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने संपुर्ण मावळ तालुक्यातील गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप करीत आहेत याबद्दल त्यांचे आभार मानतो,असे माजी सरपंच दत्तात्रय रोकडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्राध्यापक अजित गंगणमले, संतोष ससाणे,अरुण मातेरे, एकनाथ जांभुळकर, अविनाश जांभुळकर, सुनील मातेरे, दयानंद रोकडे, अंकुश गरुड, शैलेश ओव्हाळ, जितेंद्र बोरकर, राघू भालेराव, भाऊ शेडगे, गणेश देशपांडे, सौरभ ससाणे,आशिष ससाणे, आदित्य ससाणे,प्रतीक साबळे, शंकर शेडगे,कैलास भालेराव उपस्थित होते.