सुमन रमेश तुलसियानी इंटरनॅशनल शाळेत 'शिवजयंती' उत्साहात साजरी

445 views

..


Author : Admin
Publisher : Admin
Update : 1 year ago
Date : Sun Feb 18 2024

image..


कामशेत:- एस. आर. टी.आय. शाळेमध्ये *शिवजयंती* कार्यक्रमाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक व माध्यमिक विभाग यांचा या कार्यक्रमात सहभाग करण्यात आला होता. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण केले .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता शिंदे यांनी केले . दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा चव्हाण आणि आशियाना शेख यांनी केले.यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रस्तावना पूनम सपकाळ यांनी केले.

या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पाळणा, पोवाडा, मावळ्यांचे गीत, शिवकन्या नृत्य, भाषण तसेच शिवघोषणा व शिव ध्येयमंत्र , शिवकालीन लाठीकाठी खेळ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर सादरीकरण केले.कार्यक्रमातील ज्युनिअर केजी चा विद्यार्थी शिवांश कुडले याने सादर केलेला पोवाडा व इयत्ता ४ थी चा विद्यार्थी स्वराज कुडले व इयत्ता ९ वी ची विद्यार्थिनी गायत्री शिंदे यांनी सादर केलेला लाठीकाठी खेळ, दांडपट्टा, तलवारबाजी कौतुकास्पद होते.

हा कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापीका श्रद्धा चव्हाण यांच्या मार्गदर्शनात शाळेचे शिक्षक वृंद आशिष मानकर, आशियाना शेख, स्वाती कुंडले ,सारीका हुलावळे, विशाखा गदिया, कोमल कुंभार, अश्विनी झांबरे, रितेश भोकरे, भारती ओव्हाळ .समरीन खान, . प्रज्ञा यादव, . सानिया मुलानी , . शीतल जाचक , आर्शिया शेख, अस्मिता शेडगे यांच्या सहकार्याने मोठ्या आनंदात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्वाती कुडले यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.