447 views
तालुकास्तरीय शासकीय कार्यालय येणार एका छताखाली
गेल्या २० वर्षात झपाट्याने नागरिकीकरण वाढत असताना त्या दृष्टीने अद्ययावत इमारत ही गरज वाटू लागली. परंतु, याबाबत आजतागायत ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. नेमकी ही गरज आमदार सुनील अण्णा शेळके यांनी हेरली आणि पाच वर्षांपूर्वी निवडणूक लढतानाच प्रशासकीय इमारत उभारण्याचा मानस व्यक्त केला आणि निवडणुकीत विजयी होताच प्रशासकीय इमारत उभारून सर्व खात्यांचा कारभार एकाच छताखाली आणायचा अशी खूणगाठ बांधून पाठपुरावा सुरू केला.
आमदार सुनील अण्णा शेळके यांनी अवघ्या दोन वर्षात सातत्याने पाठपुरावा करून नवीन प्रशासकीय इमारतीसाठी सुमारे ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आणि प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आज या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून लवकरच या इमारतीचे लोकार्पण होणार आहे. यापूर्वी संपूर्ण तालुक्यातून विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना संबंधित कार्यालयाच्या कामासाठी त्या त्या ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे वेळही वाया जात होता तसेच अनेकदा हेलपाटे मारावे लागत होते. परंतु या इमारतीचे लोकार्पण झाल्यानंतर मात्र सर्व शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी येणार असल्याने नागरिकांच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
आमदार सुनील अण्णा शेळके यांची दूरदृष्टी, चिकाटी आणि दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचाच हे ध्येय याच जोरावर दोन वर्षे कोरोना संकट, एक वर्ष विरोधी पक्षात असताना अण्णांनी तालुक्यासाठी सुमारे ४ हजार कोटींचा निधी आणला असून यामध्ये तालुक्याचे मुख्यालय असलेल्या प्रशासकीय इमारतीसाठी प्राधान्याने लक्ष देऊन हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
नवीन प्रशासकीय इमारत वाढविणार राजधानीची शोभा !
नवीन प्रशासकीय इमारत पूर्ण झाल्यानंतर आवारातील शासकीय कार्यालयांच्या जुन्या इमारती पाडण्यात येतील तसेच इमारतीपुढे छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा ही उभारण्यात येणार आहे. याशिवाय इमारतीच्या दोन्ही बाजूने मुंबई पुणे महामार्गाला जोडणारे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे मावळ तालुक्याचे मुख्यालय राजधानी असलेल्या वडगाव शहरालाही शोभा येणार असून येथील वाहतूक पार्किंगची समस्या ही मार्गी लागणार आहे.
तालुकास्तरीय शासकीय कार्यालय येणार एका छताखाली
मावळ तालुक्याच्या प्रशासकीय कामासंदर्भात ही प्रशासकीय इमारत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण आता एकाच शताखाली सर्व तालुकास्तरीय शासकीय कार्यालय येणार आहे त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी वेळ खर्च करावा लागणार नाही. यामध्ये प्रामुख्याने तहसील कार्यालय भूमी अभिलेख कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग कृषी विभाग सहाय्यक निबंधक कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय अशी सर्व महत्त्वाची शासकीय कार्यालयांचा समावेश असून प्रांताधिकारी कार्यालय सुद्धा याच इमारतीमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.