899 views
मोबाईल नंबर न दिल्याच्या कारणावरून केला हल्ला
मावळ. :- मोबाईल नंबर न दिल्याच्या कारणावरून एका महिलेवर एका युवकाने चाकुने खुनी हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.१७) सकाळी आठ वाजल्याच्या सुमारास कान्हे येथील महिंद्रा कंपनी समोर घडली आहे. या प्रकरणी हल्यात जखमी झालेल्या महिलेने वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संतोष मारुती लगली यास अटक केली आहे.
लक्ष्मी माताप्रसाद वाल्मिकी (वय २४, रा. जांभूळ ता. मावळ ) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मी वाल्मिकी या मागील तीन महिन्यापासून कान्हे येथील महिंद्रा या कंपनीचे कॅन्टीनमध्ये काम करित असून या कॅन्टीनमध्ये संतोष मारूती लगली हा आचारी काम करित होता. मागील ४ ते ५ दिवसापासून कॅन्टीनमध्ये काम करणारा आचारी संतोष लगली काम करित असताना लक्ष्मी वाल्मिकी यांच्याकडे मोबाईल नंबर ची मागणी करित होता. तेव्हा लक्ष्मी यांनी त्याला "मी माझा मोबाईल नंबर कोणालाही देत नाही" असे सांगितले तेव्हा त्याने "मला जर तु मोबाईल नंबर दिला नाही तर तु काम कशी करते ते मी बघतो" अशी धमकी दिली होती.
त्यानंतर घडलेला प्रकार लक्ष्मी यांनी त्यांचे पती माताप्रसाद यांना सांगितला असता त्यांनी घडलेला प्रकार कॅन्टीनमधील मैंनेजर हरिश राणा यांना लक्ष्मी ला सांगण्यास सांगितले. तेव्हा लक्ष्मी यांनी संतोष याचेबाबत मैनेजर यांना सांगितले होते परंतु संतोष हा पुन्हा लक्ष्मी कडे मोबाईल नंबर ची मागणीकरून वारंवार त्रास देत होता.
त्यानंतर सोमवारी सकाळी आठ वाजल्याचे सुमारास लक्ष्मी राहते घरातून कान्हे येथील महिंद्रा कंपनीचे कॅन्टीनमध्ये कामासाठी जात असताना संतोष हा लक्ष्मी च्या समोर येऊन उभा राहून त्याने लक्ष्मीचा हात पकडून तु मला मोबाईल नंबर का दिला नाही असे म्हणून त्याने ने खिशातुन चाकु काढून मी तुला जिवंत सोडणार नाही. असे म्हणुन लक्ष्मीचे पोटावर चाकुने वार केले त्यावेळी लक्ष्मी सोबत असणारी राधीका हिने लक्ष्मीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता संतोष याने तिला धक्का दिला आणि तेथून पळून गेला. लक्ष्मी तेथुन जवळच असणाऱ्या कंपनीचे गेट जवळ जखमी अवस्थेत गेले व राधीका हि सुध्दा घडलेला प्रकार बघून कंपनीच्या गेटकडे पळत गेली. कंपनीच्या गेट जवळील तेथील सेक्युरिटी यांनी अँब्युलन्स बोलावून त्यांना तातडीने सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.