जुगार खेळणाऱ्या १० जणांवर पोलिसांची कारवाई, खेळणाऱ्यांपैकी एकाचे ताब्यात सापडले २० हजारांचे एम.डी. पावड

361 views

सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची आणखी एक दमदार कारवाई


Author : Admin
Publisher : Admin
Update : 1 month ago
Date : Tue Aug 13 2024

image..

मावळ :- लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वेहेरगाव येथे एका घरामध्ये अवैधरित्या जुगार अड्डा सुरू आहे. त्यावरून सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यासाई कार्तीक यांनी दिनांक 12/08/2024 रोजी रात्री त्यांचे पथकासह सापळा रचुन मौजे वेहेरगाव येथील श्री मडवी यांचे बंगल्यामध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये आरोपी इसम नामे

1) राहुल भरत इंगुळकर, (वय ३४ रा. वाकसई ) 2) संतोष ज्ञानदेव बोत्रे (वय ३६ वर्षों रा. वेहेरगांव ता. मावळ ) 3) मंगेश विठ्ठल देशमुख (वय ४६ रा. वेहेरगांव ता. मावळ) 4) संजय विठ्ठल देशमुख (वय ४३ वर्षों रा. वेहेरगांव ता मावळ ) 5) दिनेश पांडूरंग गायकवाड (वय ४० रा.. वेहेरगांव ता. मावळ) 6) चंद्रकांत हौजी देवकर (वय ४२ रा. वेहेरगांव ता. मावळ) 7) विनोद शरद नाणेकर (वय ४२ रा. बेहेरगांव ता. मावळ) 8) अजित सुनिल देवकर (वय २९ वर्षों रा. वेहेरगांव ता. मावळ) 9) मंगेश मारुती राणे (वय ४० रा. कामशेत शिवाजी चौक ता मावळ) 10) संतोष काशिराम दळवी (वय ४५ रा. बेहेरगांव ता. मावळ) हे पैशांवर तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना मिळून आले.

तसेच पंचासमक्ष पोलिसांनी वर नमूद आरोपींची झडती घेतली असता

आरोपी नामे संतोष काशिराम दळवी याने स्वतःचे पॅन्टचे खिशामध्ये 2.030 ग्रॅम कि. वजनाचे व रु.20,300/- एवढ्या किमतीचे एम.डी पावडर हा नशाकारक अमली पदार्थ विक्रीकरिता बाळगल्याचे मिळुन आले आहे. सदरच्या कारवाईमध्ये वर नमुद सर्व आरोपींचे ताब्यातुन रोख रक्कम, वाहने व इतर साधने असा एकूण रु 74,14,050/- (अक्षरी चौऱ्ह्यातर लाख चौदा हजार पन्नास रुपये) एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदरबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.न.249/2024 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 5. एन.डी.पी.एस. 1985 चे कलम 8 (क) 21 (ब) 

अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करत आहेत.


सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि शेवते, पोसई शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ मंगेश मारकड यांचे पथकाने केली आहे.