प्रत्येक महिला सक्षम व्हावी हाच उद्देश- सारिका शेळके

113 views

..


Author : Admin
Publisher : Admin
Update : 1 month ago
Date : Thu Aug 08 2024

image...



तळेगाव दाभाडे - दि.८ कुलस्वामिनी महिला मंच मावळ यांच्या वतीने तळेगाव दाभाडे शहरातील महिलांसाठी दोन ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या मोफत क्लासेसचा शुभारंभ कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी बोलताना सारिका शेळके म्हणाल्या,"प्रत्येक महिला स्वावलंबी व सक्षम व्हावी यासाठी आमदार सुनिल शेळके नेहमीच प्रयत्नशील असतात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.या क्लासेसच्या माध्यमातुन प्रत्येक महिला सक्षम व्हावी हाच उद्देश आहे.त्यांना आर्थिक सक्षमता मिळाल्यास जिद्द आणि मेहनतीच्या बळावर प्रत्येक महिला कुठल्याही क्षेत्रात नक्कीच भरारी घेऊ शकते."

या शुभारंभ प्रसंगी माजी नगरसेविका संगिता शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षा शैलजा काळोखे, भावना शेळके,पल्लवी शेळके, शबनम खान,अर्चना काटे,संध्या देसाई, प्रिया मोडक, अर्चना दाभाडे, रश्मी जगदाळे, वृषाली टिळे उपस्थित होत्या.


तळेगाव दाभाडे शहरात स्टेशन भागात शुभम कॉम्प्लेक्स येथे व गाव भागात तेली समाज कार्यालय येथे शिवण क्लास,आरी वर्क, नेल आर्ट, सेल्फ मेकअप, फॅशन डिझायनिंग असे क्लासेस मोफत शिकवले जाणार आहे.जास्तीत जास्त महिला-भगिनींनी या क्लासमध्ये सहभाग घ्यावा,असे आवाहन कुलस्वामिनी महिला मंचच्या वतीने करण्यात आले आहे.