भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी मित्र पक्षाची भरपूर गळचेपी सहन केली - रविंद्र भेगडे

340 views

आत्ता माघार नाही : रविंद्र भेगडे यांची गर्जना .


Author : Admin
Publisher : Admin
Update : 1 month ago
Date : Fri Aug 02 2024

imageभाजप मेळावा वडगाव मावळ

मावळ : भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी मित्र पक्षाची भरपूर गळचेपी सहन केली. अगदी गावपातळीवरील विविध कार्यकारी सोसायटी सारख्या संस्थांमध्येही भाजपच्या कार्यकर्त्यांची गळचेपी होत असून ; हे सर्व असह्य होत आहे. यंदा मावळ विधानसभेवर भाजपचे कमळच फुलणार , आत्ता माघार नाही..!! अशी गर्जना मावळ विधानसभा भाजप प्रमुख रविंद्र भेगडे यांनी भेगडे लॉन्स , वडगाव मावळ येथे संपन्न झालेल्या भाजपच्या विराट विजयी संकल्प मेळाव्यात केली.


आजच्या विजयी संकल्प मेळाव्याला भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची लक्षणीय संख्या बघायला मिळाली. रविंद्र भेगडे पुढे म्हणाले , " भाजपला मानणारा मोठा मतदार आणि कार्यकर्त्यांचा संच मावळ विधानसभेत आहे. इथला परंपरागत मतदार यांची नाळ भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी , कार्यकर्त्यांशी जोडली गेली आहे. आणि त्यामुळेच मावळ विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार पाठवायचा असा प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्त्याचा यंदा निर्धार आहे." 

..


मावळ विधानसभेत प्रत्येक गावातील भाजप पक्ष संघटन मजबूत करून , रविंद्र भेगडे यांनी आज घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मावळ विधानसभेत महायुती मध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आज , पेटलेली ठिणगी अजून किती पेट घेणार हे काळ ठरवणार आहे. 


या विजयी संकल्प मेळाव्यासाठी , माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, कोअर कमिटी अध्यक्ष निवृत्ती शेटे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड, तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील , माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, युवा मोर्चा अध्यक्ष नितीन मराठे,महिला मोर्चा अध्यक्षा सायली बोत्रे,लोणावळा शहर अध्यक्ष अरुण लाड, देहूरोड शहर अध्यक्ष .रविंद्र उर्फ लाहूमामा शेलार , वडगाव शहर अध्यक्ष संभाजी म्हाळसकर , देहुगाव शहर भाजपा अध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल यांच्यासह मावळ विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.